Monday, February 25, 2019

मी पाहीलं सखेस..! (कविता)


  

 मी पाहीलं सखेस ...!

प्रातः समयेसी,
रविकिरण आकाशी डोकावताना.
मी पाहीलं सखेस,
स्वप्न रजनीत झोकावताना.
वर-उंच नभेसी,
घन मेघ अंतरी साठवत,
मनफुल-पाकळी,
दुर-उंच भरारी घेताना.

मी पाहीलं सखेस,
वादळ, वनात झेपावताना.
गिरकी घेत सभोवती,
घनदाट वनरायी गोठवत,
झाडं, फुलं, पालवींच्या,
आठही दिशा नाचवताना.

मी पाहीलं सखेस,
चमक विजेची,
प्रकाशीत होताना.
भर पावसात मेघांशी,
जीव एकवटत कंठी,
खाली पाताळी खोलवरून
जमीनीच्याही दाही दिशा
पेटवताना...
                  
मी पाहीलं सखेस,
सागरातील लाटांच्या वाटा,
उंचावरून, काठाशी भिडताना,
नयम-रम्य किरण साक्षीने,
रविराज सागरी बुडताना...


  - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे                                              
    ☎️ मो.न. 830800335     
       

Sunday, February 17, 2019

आई..! तुझे आयुष्य म्हणजे... (कविता)

    आई ...!
    तुझे आयुष्य म्हणजे...

आमच्या सुखी जीवनासाठी,
अनवानी पायाने...
निखाऱ्यातून ‘चालने’ होते.
दुष्काळाच्या आगीतून,
ताऊन-सुलाखून निघालेले,
चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते.
अंध्याऱ्या रात्रीतील...
शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते.

आम्हा सर्वांच्या सुखासाठी,
स्वतःच, दुःखाचे विष पिऊन,
विचारमंथनातून मिळवलेले,
कंठातील अनमोल ‘रत्न’ होते.
हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून,
मनाच्या काळजावर कोरलेले,
विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते.


आपल्या सुखी कुटुंबासाठी,
काबाड-कष्ट, उपास-तापास करून,
कणा-कणांनी घडवलेले ‘घर’ होते.
आपुलकी-जिव्हाळा-प्रेम, वात्सल्य-ममतेनी,
माणसाळलेले माणुसकीचे ‘घरदार’ होते.
बोचऱ्या थंडीतील उबीचे ‘चादर’ होते,
कोरडया विहीरीतील पाण्याचे ‘पाझर’ होते.

                  
                                - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे 
                                                  ☎️ मो.न. 8830800335