Sunday, February 17, 2019

आई..! तुझे आयुष्य म्हणजे... (कविता)

    आई ...!
    तुझे आयुष्य म्हणजे...

आमच्या सुखी जीवनासाठी,
अनवानी पायाने...
निखाऱ्यातून ‘चालने’ होते.
दुष्काळाच्या आगीतून,
ताऊन-सुलाखून निघालेले,
चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते.
अंध्याऱ्या रात्रीतील...
शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते.

आम्हा सर्वांच्या सुखासाठी,
स्वतःच, दुःखाचे विष पिऊन,
विचारमंथनातून मिळवलेले,
कंठातील अनमोल ‘रत्न’ होते.
हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून,
मनाच्या काळजावर कोरलेले,
विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते.


आपल्या सुखी कुटुंबासाठी,
काबाड-कष्ट, उपास-तापास करून,
कणा-कणांनी घडवलेले ‘घर’ होते.
आपुलकी-जिव्हाळा-प्रेम, वात्सल्य-ममतेनी,
माणसाळलेले माणुसकीचे ‘घरदार’ होते.
बोचऱ्या थंडीतील उबीचे ‘चादर’ होते,
कोरडया विहीरीतील पाण्याचे ‘पाझर’ होते.

                  
                                - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे 
                                                  ☎️ मो.न. 8830800335                                 

No comments:

Post a Comment